Balaji Temple Washim, History, Balaji Mandir Washim, History, श्री बालाजी मंदिराचा इतिहास मराठी

इतिहास

श्री बालाजी मंदिराचा इतिहास

Shri Balaji Temple Washim तिरूपतीचा बालाजी म्हणजेच गिरीचा सावकार तर वाशीमचा बालाजी जहागिरदार अशी वाशीमच्या बालाजीची भारतवर्षाची ख्याती आहे. भाविकांची श्रध्दा, पुराणकाल आणि मध्ययुगीन इतिहासातील दुवा सांधणारे, वास्तुशासाची वैशिष्टये दिमाखाने मिरवणारे वाशीमचे श्री बालाजी संस्थान आजही जनार्दन विष्णू मुर्तीच्या रूपाने पुरातन वत्सगुल्म नगरीची आणि भव्य देवालयाच्या रूपाने मध्ययुगीन वाशीम नरीच्या इतिहासाची वैभवशाली साक्ष देत उभे आहे. वाशीमच्या हृदयस्थानी असलेले वाशीमचे बालाजी संस्थान पुरातन इतिहास आणि मध्ययुगीन कालखंडाचा इतिहास आपल्यासमोर जिवंत करते. जवळपास सव्वादोनशे वर्षापूर्वी वाशीम नगरीतील एक राजपूत स्त्री दिवंगत झाली. तिच्या अत्यंसंस्कारासाठी सध्याच्या चंद्रशेखर मंदिराजवळ एक खड्डा तयार करीत असतांना चंद्रशेखर व इतर मुर्ती सापडल्या. ही वार्ता परिसरात पोहचली. त्यावेळसचे नवाब हसमतजंग बहादूर आणि येथील देशमुख , जमीनदार मंडळीने व गावक-यांनी सापडलेल्या मुर्ती पाहिल्या आणि तेथे आणखी खणावयास सांगितले. त्यातून बालाजीची विष्णू मूर्ती, लक्ष्मी, गणेश शारदा व अन्य मूर्ती अवतीर्ण झाल्या. वाजगाजत या मुर्ती काटीवेस वरील हनुमान मंदिराच्या पारावर आणण्यात आल्या.

Shri Balaji Temple Washim - Ideol

पुढे त्या मुर्ती सध्याचे बालाजी मंदिर असलेल्या ठिकाणी एक छोटेसे घर बांधून स्थापित करण्यात आल्या. पुढे कारंजा येथील परशुरामपंत देशपांडे यांनी या मुर्ती आम्हास दया, आम्ही कारंजा मंदिर बांधू असे म्हटले. मात्र, येथील नवाब व गावकरी मंंडळीनी त्यास नकार दिला. त्यावेळी वाशीम शहर तीन राजघराण्यात विभागाले होते. मुर्ती नागपूरकर भोसल्यांचे अधिपत्य असलेल्या पश्चिमेकडील भागात सापडल्या होत्या. त्यावेळेस नागपूर येथे सेनासाहेब सुभा जानोजी भोसले हे होते. त्यांचे दरबारी मुळचे वाशीम जिल्हयातील खडी धामणी येथील भवानीपंत काळू हे सरदार होते. रघुपतीराजे भोसले यांच्या कारकिर्दीत बंगालची खंडणी वसुल करण्याकरीता सरदार भवानीपंत काळू हे चिमणाराजे भोसले यांच्यासह त्याच सुमारास बंगालच्या स्वारीवर निघाले होते. त्याची वाशीम येथे छावणी पडली. त्यावेळी वत्सगुल्म वाशीम येथे देवतांच्या मुर्ती सापडल्याची वार्ता त्यांच्या कानी पोहचली. त्या मुर्तीचे त्यांनी दर्शन घेतले. मी जर बंगालच्या स्वारीवर यशस्वी झालो तर तुझे भव्य देवालय येथेच बांधीन असा मनोमन संकल्प त्यांनी केला. पुढे बंगालची स्वारी यशस्वी झाली. त्या स्वारीवरून परतल्यानतर भवानीपंतानी आपला संकल्प भोसल्यांच्या कानी घातला. त्या संकल्पाप्रमाणे वाशीम येथे श्री बालाजीचे भव्य देवालय व त्याच्याच बाजूला दगडी देवतलाव व पुष्करणी बांधण्यात आली. या मंदिराचे व देवतलावाचे काम पंचवीस वषापर्यंत चालू होते. देशभरातील कुशल कारागीर त्यासाठी परिश्रम घेत होते. या बांधकामाला यावेळी दहा लाख रूपये खर्च झाला. श्री बालाजी मंदिरात व मुर्तीच्या बाजूला असलेल्या इतर मुर्ती श्रावण शुध्द १३ शके १६९९ म्हणजे १५ ऑगष्ट १७७७ मध्ये सापडल्या. देवालयाच्या बांधकामाला श्रावण शुध्द १३ शके १७०० म्हणजे ६ ऑगष्ट १७७८ ला सुरूवात झाली.

देवालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिरात श्री बालाजी व इतर सापडलेल्या मुतीची प्राणप्रतिष्ठा मोठया समारभंपूर्वक श्रावण वद्य शके म्हणजे २२ ऑगस्ट १७८३ रोजी शुक्रवारला करण्यात आली. तेव्हापासून शुक्रवारच्या दर्शनाचे शहरात फार महत्व आहे. हा मंदिर बांधकामाचा इतिहास मध्युगातला असला तरी मंदिरातील बालाजीच्या मुर्तीला मात्र पुरातन संर्द आहे. वाशीमच्या वत्सगुल्म महात्म या पुरातन पुस्तकात या मुतविषयी आख्यायिका सांगण्यात आली आहे. त्यानुसार वैशाखन मुनी एकदा वत्सारण्यात आले. तेथे चोराने त्यांची देवार्चन करंडीका चोरली. त्यात जनार्दन मुर्ती होती. तेव्हा वैशाखन मुनिना फार दुख झाले. तीन उपवास घडले. मग श्री जनार्दनाने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. त्यानंतर त्यांनी येथील जनार्दनाक्षितीर्थात स्नान करुन प्रत्यक्ष पुजा केली व मुनी मुक्त झाले. पुढे भक्तांकरीता तेथे जनार्दनाने आपली चतुर्भुज प्रतिमा येथे स्थापन केली. तीच ही मूर्ती आहे असे सांगितले जाते. मात्र नंतर मूर्ती ंमूर्तीभंजक आक्रमकांच्या काळात या मूर्तीसह अन्य मुर्तीया भूमिगत कराव्या लागल्या पुढे त्या राजपूतच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सापडल्या. अशारितीने पुराण व मध्ययुगीन इतिहासाचा दुवा या देवालयाने साधला आहे.

मंदिरात होणारे उत्सव.

Shri Balaji Temple Washim - Ideol

श्री बालाजीच्या मुख्य वार्षिक उत्सव अश्विन महिन्यात चित्रा नक्षत्रावर सुरु होतो. श्रीच्या उत्सवाचे पहिले ध्वजारोहण चांदीच्या गरुडखांबावर होते. या उत्सवात विविध धामक कार्यक्रम व व्याख्याने होतात. अष्टमीच्या दिवशी गावाबाहेरच्या चामुंडा देवीला परकर व पुजेचे ताट संस्थानमधून वाजत गाजत नेले जाते. नवमीच्या दिवशी रथोत्सव होतो. दुस-या दिवशी बालाजीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. अविन वद्य एक म्हणजे कोजागिरी पौणिर्मेच्या दुस-या दिवशी सायंकाळी गोपालकाल्याचे किर्तन होवून गोपालकाला होतो . या दहिहांडीच्या दिवशी यात्रा भरते . ही यात्रा लक्ष्मी पुजना पर्यंत सतत दिवस चालते. पुर्वीच्या काळी मोठी भव्य होणारी यात्रा दिवसेंदिवस संकुचित होत आहे. या सोबतच श्रावण शुध्द त्रयोदशीला श्री बालाजीची वर्षगाठ साजरी करण्यात येते.

श्री बालाजी मुर्तीचे वैशिष्ट.

सध्या जी बालाजीची मुर्ती आहे, ती विष्णूची जनार्दन मुर्ती आहे. गिरीच्या बालाजीच्या मुर्ती चे जसे वरदहस्त असलेले ध्यान आहे. तसे हे नाही. अलिभाषितार्थ चिंतामणीचा अथवा मुर्ती शाश्वतिष्णूच्या केशव, नारायणदी चोवीस अवतारांचे जे वर्णन आहे, त्यापैकी जनार्दन अवताराची ही मुर्ती आहे. या विष्णू अवताराच्या मुर्तीत चार हाती शंख, चक्र, पदम व गदी ही चार आयुधे असतात. परंतू निरनिराळया हाती निरनिराळी आयधे बदलून असल्यामुळे मुर्तीस निरनिराली नावे देण्यात आलेली आहेत. या ठिकाणी गणेश सरस्वतीच्या मुर्ती खाली शिलालेख आहे. त्या लेखांच्या अक्षर व टीकेवरुन या मुर्ती बारा व्या शतकातील असाव्या असे अनुमान तज्ज्ञांनी काढले आहे.

सुर्यनारायण घेतो श्री बालाजीचे दर्शन.

या मंदिराच्या बांधकामाचे आणखी एक महत्वाचे वैशिष्टये म्हणजे सुर्यनारायण बालाजीचे दर्शन व्हावे, यासाठी र्गगृहाच्या मुर्तीच्या समोरील तीत प्रवेशव्दाराच्या वरच्या बाजूला एक झरोका आहे हे मंदिर पूर्वामिम्य्मूख असून सुर्याने उत्तरायणात प्रवेश केल्यापासून ते दक्षिणायन सुरु होतो पर्यत म्हणजे डिसेंबर ते जून या काळात सुर्यकिरण मुर्ती वर पडतात. जूनला कुठलीही पूजा मंदिरात होत नाही.